3 मे रोजी राज्यात काही अघटीत होऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

राज्यात शांतता राखण्यासाठी 1 मेला राज्यभरात वंचित शांती मार्च काढणार

Updated: Apr 26, 2022, 09:43 PM IST
3 मे रोजी राज्यात काही अघटीत होऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती title=

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात सुरु असलेल्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यातले अनेक मंत्री ईडीच्या चौकशी कक्षेत असल्याने भोंग्यांचा प्रश्न केंद्राकडे टोलवून सरकारला आपल्या मंत्र्यांना अभय द्यायचं असल्याचं आंबेडकरांनी आरोप केला आहे. तर राज्यात सुरू असलेल्या भोंग्यांसंदर्भात महाराष्ट्राचं धोरण विचित्र असल्याचं ते म्हणाले.

राज्यात शांतता राखण्यासाठी 1 मेला राज्यभरात वंचित शांती मार्च काढणार असल्याचं ही ते म्हणाले. सरकारलाही शांतता पाहिजे दंगल होऊ नये अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं म्हणत आंबेडकरांनी राज्यसरकारची पाठराखण केली. तर राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला परवानगी मिळू नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

सरकार बरखास्तीसाठीच भाजप कायदा सुव्यवस्था खराब असल्याच्या वल्गना करत आहे असंही आंबेडकर म्हणाले. तर रामाचा मुद्दा निकाली निघाला, त्यामुळेच हनुमानाच्या नावाचा वापर सुरू झाल्याचं ते म्हणाले. तर मनसे हा राज्यव्यापी पक्ष नसून त्याला पाठबळ कुणाचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.