नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी  नरेंद्र महाराज,  कानिफनाथ महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच गडकरी यांनी नाणीज नवा मठ ते जुना मठ हा पालखी मार्गाचा रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 1, 2023, 04:30 PM IST
नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण title=

Nitin Gadkari at Nanij in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी  नरेंद्र महाराज,  कानिफनाथ महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच गडकरी यांनी नाणीज नवा मठ ते जुना मठ हा पालखी मार्गाचा रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गडकरी यांचा महाराजांच्या हस्ते गौरव

सुंदरगडावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा गौरव करताना नरेंद्र महाराज. सोबत उल्हास घोसाळकर, प्रमोद जठार, मंत्री उदय सामंत, कानिफनाथ महाराज आदी.  ( छाया - सचिन सावंत)

नाणीज येथे श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. श्रीराम नवमी निमित्ताने सुंदर गडावर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन झाले. यावेळी नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी गडकरी यांनी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, माझी येथे येण्याची बरेच दिवसांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. जगद्गुरुश्री यांनी येथील नैसर्गिक भूमीचा, जागेचा अतिशय सुंदर उपयोग करुन घेतलेला आहे. येथील, भव्य संतपीठ, समोरचे स्टेडियमसारखी म्हणजेच ओपन इअर थिएटर सारखी रचना. झाडांच्या सावलीत बसण्याची व्यवस्था केली. याबाबत महाराजांचे अभिनंदन. 

हिंदू धर्म पवित्र, सहनशील आहे. येथील जीवनपद्धती आदर्श आहे. महाराजांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी धर्माचे रक्षण केले. अनेक लोकांना वाचवले. अनेक लोक गैरसमजुतीतून गेले, त्यांना त्यांनी परत आणले. आपण कोणाच्या विरोधात नाही. आपण विश्वाचे कल्याण चिंतणारे आहोत. पण धर्माचा संबंध कर्तव्याशी असतो. कर्तव्याचा अधिकाराशी व अधिकाराचा तत्व, विचार, मूल्यांशी असतो. मी सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते केले. व्यसनमुक्ती, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनातून सुखी, समाधानी राष्ट्र निर्माण होते, असे यावेळी गडकरी म्हणाले. 

श्रीराम जन्मोत्सव उत्सव  

मुख्य सोहळ्यापूर्वी श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात झाला. त्यामित्त मंदिर अकर्षकरित्या सजवण्यात आले होते. पाळनाही फुलांनी आकर्षक सजवला होता. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती.