Sharad Pawar On Maharashtra Band : बदलापूर अत्याचार घटनेनंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याची टीपण्णी हायकोर्टाने केली आहे. हायकोर्टाने बंदची परवानगी नाकारली आहे. हायकोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहान केले आहे.
पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
शरद पवार सोशल मिडिवर पोस्ट अपडेट करत महाराष्ट्र बंद करायचा की नाही याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.
दरम्यान, बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा शरद पवारांनी समाचार घेतलाय. मुख्यमंतत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान करायला नको होतं, असं उत्तर शरद पवारांनी शिंदेंना दिलंय. बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. याला शरद पवारांनी आज दिलंय. कोणता पक्ष आंदोलनात होता, असा सवाल त्यांनी शिंदेंना केलाय.