ठरलं! या तारखेपासून वाजणार शाळेची घंटा, प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात मोठा निर्णय

पालकांनो तयारीला लागा! या तारखेपासून सुरू होणार प्राथमिक शाळा  

Updated: Dec 9, 2021, 06:09 PM IST
ठरलं! या तारखेपासून वाजणार शाळेची घंटा, प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात मोठा निर्णय

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार आहेत. 13 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवी शाळा सुरू होणार आहेत. 

यापूर्वी 1 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता अखेर शाळा सुरू करण्यात येणार आहे. 

शहरातील 506 शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजताना दिसणार आहे. शाळेबाहेर मुलांचा किलबिलाट होताना पाहायला मिळणार आहे. नियमांचे पालन करून शाळा सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.