'ताडोबा' अभयारण्यातील देव दर्शनावरुन तणाव, शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या

 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 'ताडोबा देव ' देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय.  

Updated: Dec 24, 2017, 01:58 PM IST
'ताडोबा' अभयारण्यातील देव दर्शनावरुन तणाव, शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या title=

चंद्रपूर : येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 'ताडोबा देव ' देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय. दरम्यान, शेकडो ग्रामस्थांनी गेटबाहेर ठिय्या मांडल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेय.

शेकडो ग्रामस्थ धडकले

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खुटवंडा प्रवेशद्वारासमोर ८ गावातील शेकडो ग्रामस्थ धडकले आहेत. या भागात पोलिसांनी प्रवेशास मज्जाव केला आहे. वरिष्ठ पोलीस आणि वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देव दर्शन घेण्यासाठी मागणी 

ताडोबादेव दर्शन पूजा आणि तलावातील पाणी शेतीवर शिंपडल्यास शेतीवरील अरिष्ट दूर जाते, अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्यासाठी ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी मागणी केली आहे. 

एसआरपी कुमक मागविली

मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीला सोडयचे कसा असा प्रश्न असून गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झालेय. त्यामुळे अधिक पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. दरम्यान, ताडोबा व्यवस्थापनाने विशेष पोलीस दलाला पाचारण केले  आहे. त्यामुळे तणावात अधिकच वाढ झालेय.