व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न, नगरसेवकावर गुन्हा दाखल

कल्याण मध्ये गावंगुंडाची दहशद.

Updated: Feb 25, 2021, 10:33 PM IST
व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न, नगरसेवकावर गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी रिक्षाचालकाला भररस्त्यात फरफटत नेत, मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरात ही घटना घडली आहे.

गाव गुंड इथेच थांबले नाहीत तर या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून रिक्षाचालकाचे अपहरण करत त्याला धमकावण्यातही आले आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह सात-आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसुलीसाठी रिक्षाचालकाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.