भाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 

Updated: Oct 19, 2019, 08:55 AM IST
भाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भंडारा : भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. भंडारा-साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या हल्यात नाना पटोले यांचा पुतण्या जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले तर आणखी त्यांचे एक सहकारीही जखमी झालेत. 

फुके समर्थक लिफाफा भरून पैसे वाटत असल्याने नाना पटोले यांच्या पुतण्याने हटकले. यावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. पोलिसांनी १७ लाख ७४ हजार रुपयाची रोकड जप्त केली आहे. परिणय फुके, दीपक लोहिया आणि इतर ३० लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.