मतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे. 

Updated: Oct 19, 2019, 08:50 AM IST
मतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे. मतदारांना पैसे वाटप होत असल्याची पहिली तक्रार जळगावात शिवसेनेने केली आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यावतीने त्यांचे दोन कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील लमांजन गावात मतदारांना पैसे वाटप करीत असल्याने त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचं समोर येते आहे.

जळगाव जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी या कार्यकर्त्यांना पकडून देत तक्रार केली आहे. दोघा कार्यकर्त्यांना त्यांनी विचारल्यावर त्यांनीही आपण अत्तरदे यांचे पैसे वाटप करत असल्याचे कबुल केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर रात्री व्हायरल झाला. सुमारे ३५ हजारांची रक्कम जप्त करून एमआयडीसी पोलिसांत आणण्यात आली होती. याबाबत उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.