तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल; पडळकरांची रोहित पवारांवर टीका

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा

Updated: Oct 10, 2020, 01:39 PM IST
तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल; पडळकरांची रोहित पवारांवर टीका title=

मुंबई : “गेल्या ५० वर्षांपासून नेतृत्व करत असलेले शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला.

तसेच 'रोहित दादा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा. म्हणचे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल,' अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.