close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नाशिकमध्ये युतीला धक्का, भाजप नेते कोकाटे अपक्ष निवडणूक लढणार

नाशिकमध्ये युतीत बंडखोरी...

Updated: Apr 4, 2019, 07:41 PM IST
नाशिकमध्ये युतीला धक्का, भाजप नेते कोकाटे अपक्ष निवडणूक लढणार

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपकडून विधानसभेचा आश्वासन मिळाल्यास ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी ही चर्चा आहे. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा अर्ज दाखल होण्याआधीच त्यांनी आघाडी घेत नाशिकची लढत तिरंगी होणार हे स्पष्ट केले. मुहूर्तावर अर्ज भरला असल्याचे सांगत वेळ मिळाल्यास एबी फॉर्म ही देण्यात येईल असं वक्तव्य करत निवडणूक लढवणारच असं दाखवून दिले आहे. येत्या नऊ तारखेला मिळाव्यात ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना फटका बसू शकतो. भाजपकडून कोकाटे यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. युती होणार नसल्याचे गृहीत धरुन त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. पण ऐनवेळी युती झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत.