भाजप आमदार अपूर्व हिरे आणि प्रशांत हिरे पुन्हा राष्ट्रवादीत

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का

Updated: Dec 6, 2018, 07:06 PM IST
भाजप आमदार अपूर्व हिरे आणि प्रशांत हिरे पुन्हा राष्ट्रवादीत

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातलं एकेकाळचं प्रबळ राजकीय घराणं असलेलं आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या हिरे पिता-पुत्रांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये उद्या माजी मंत्री प्रशांत हिरे आणि त्यांचे पुत्र, भाजप आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी सुरू असलेला संघर्ष मिटल्यानंतर आता हिरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरेंपाठोपाठ भाजप मधून राष्ट्रवादीत आलेल्या इतर नेत्यांनाही घरवापसीचे वेध लागलेले आहेत. मात्र ११ डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर इतर नेत्यांची राजकीय दिशा ठरणार आहे. त्यामुळं ११ डिसेंबरनंतर कोण कोण घरवापसी करतं याकडे लक्ष लागलं आहे.