दिवेघाट अपघात, भाजपकडून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

नामदेव महाराजांच्या दिंडीला दिवेघाटात अपघात झाला. त्यामध्ये नामदेव महाराजांचे वंशज यांचा मृत्यू झाला. 

Updated: Nov 19, 2019, 07:09 PM IST
दिवेघाट अपघात, भाजपकडून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
संग्रहित छाया

पुणे : अवघा महाराष्ट्र आज एका अपघातानं हळहळला. नामदेव महाराजांच्या दिंडीला दिवेघाटात अपघात झाला. त्यामध्ये नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराजांचा आणि अतुल महाराज आळशी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. अपघात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना भाजपच्यावतीने ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळलं असलं तरी वारकऱ्यांच्या आशीर्वादानं सरकार आलं तर वारी सोहळ्याला संरक्षण देण्याची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिले आहे. 

दिवे घाटात जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याने जेसीबी वारकरी दिंडीत घुसला आणि हा अपघात घडला. नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना हा अपघात झाला. जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात येत आहेत.  काल रात्री त्यांनी सासवडमध्ये मुक्काम केला. सासवडहून पहाटे चार वाजता दिंडीला सुरुवात झाली होती. घाट सुरु होताना नाश्ता करण्यासाठी मुक्काम केला. त्यावेळी एका जेसीबीने दुचाकीला उडवले.  जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. त्याचवेळी दिंडी सुरु असताना वारकऱ्यांनी जेसीबी चालवू नको, अशी विनंती जेसीबीच्या चालकाला केली होती. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. 

अपघातातील मृतांची नावे

१) अतुल आळशी
२) सोपान तुलसीदास रामदास (नामदेव महाराजांचे १७ वे वंशज)

जखमींची नावे

१) विष्णू सोपान हळवाल.
२) शुभम नंदकिशोर आवरे
३) दीपक अशोक लासुरे
४) गजानन संतोष मानकर
५) वैभव लक्ष्मण बराटे
६) अभय अमृत मोकम्फले
७) किर्तीमान प्रकाश गिरजे
८) आकाश माणिकराव भाटे
९)ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम
१०) गरोबा जागडे
११) विनोद लहासे
१२) नामदेव सागर
१३) सोपान महासाळकर
१४) गजानन सुरेश मानकर
१५) सोपान मासळीकर