काळा पैसा धारकांची माहिती सर्व सामांन्यांना मिळणार- जावडेकर

नोटबंदी नंतर कुणाकडे काळा पैसा आहे, याची माहिती सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळं सामान्य माणसांना देखील काळा पैसा धारकांची माहिती मिळणार आहे.

Updated: Oct 29, 2017, 11:23 PM IST
काळा पैसा धारकांची माहिती सर्व सामांन्यांना मिळणार- जावडेकर  title=

पुणे : नोटबंदी नंतर कुणाकडे काळा पैसा आहे, याची माहिती सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळं सामान्य माणसांना देखील काळा पैसा धारकांची माहिती मिळणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. आठ नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होतयं. तो दिवस भाजप काळा पैसा विरोधी दिन म्हणून देशभर पाळणार आहे.

नोटबंदी नंतर शेल कंपन्या आणि बॅंक खात्याद्वारे काळ्या पैशाची उलाढाल झाली आहे. अनेक खात्यांमध्ये अचानक उलाढाल वाढली आहे. त्या सर्व माहितीचे विश्लेषण सुरु आहे. त्यानंतर ही माहीती जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचही जावडेकरांनी सांगितलं.

प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात बोलताना ही माहिती दिली आहे.