तारापूर एमआयडीसी स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

Updated: Jan 12, 2020, 04:49 PM IST
तारापूर एमआयडीसी स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत title=

पालघर : तारापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात दोन-तीन कंपन्यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंगचं काम सुरू आहे. स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य देण्यात यावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.