"बाळासाहेबांचे विचार रक्तात"; विरारच्या बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांचा रक्ताभिषेक

विरार येथील बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांनी रक्ताभिषेक केला आहे

Updated: Jul 24, 2022, 06:04 PM IST
"बाळासाहेबांचे विचार रक्तात"; विरारच्या बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांचा रक्ताभिषेक title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेतून (Shivsena)अद्यापही गळती सुरुच आहे. मात्र शिवसैनिकही अद्यापही आपण शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे विविध मार्गांनी दाखवून देत आहेत.

अशातच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवन्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आहे. शिवसेनेतून पुकारलेल्या बंडावर विरारच्या शिवसैनिकांनी रक्ताभिषेक करुन शिंदेंना सडेतोर उत्तर दिले आहे.

विरार येथील शिवसैनिकांच्या वतीने रविवारी बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांनी हाताला सुई टोचून रक्ताभिषेक  केला आहे. महिल्या कार्यकर्त्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार असल्याची शपथ घेतली यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली आहे

बाळासाहेबांचे विचार आमच्या हृदयात नाही तर रक्ता रक्तात आहेत अशी भावना व्यक्त करत ही शपथ शिवसैनिकांनी घेतली. शिवसेनेची पाळं मुळं ही अगदी खोलपर्यंत रुजली असून ती नष्ट करण अश्यक्य असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले.