BMC Budget 2022-23 : शिक्षण समितीचा ३३७० कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प उपायुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.

Updated: Feb 3, 2022, 10:45 AM IST
BMC Budget 2022-23 : शिक्षण समितीचा ३३७० कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प उपायुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. या वर्षी शिक्षण समितीचा ३३७० कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार असून या नव्या २ शाळांकरता १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

- व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटरसाठी ३८ कोटी २ लाख,
- थिंकींग लॅबसाठी 29 लॅब ( या प्रकल्पाद्वारे २५ शाळांमध्ये विद्याथ्यआंची वैचारिक क्षमता वाढून विकास होईल )
- डिजीटल क्लासरुमसाठी २८ लाख तरतुद 
- शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी - ४१९ कोटी
- शाळांची देखभाल- स्वच्छतेसाठी - 75 कोटी
- टॅब योजनेसाठी - 7 कोटी