Navi Mumbai Crime News: 12 डिसेंबर 2023 रोजी एका युवकाने सानपाडा रेल्वे स्थानकात लोकल खाली येत आत्महत्या केली. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या फोनमध्ये सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये त्याने त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्याची कबुली दिली होती. तसंच, सुसाइड नोटमध्ये एक कोडदेखील लिहला होता. हा कोड होता L01-501. या एका कोडवरुन पोलिसांना मृतदेह शोधण्याचे आव्हान होते. अखेर पोलिसांना मृतदेह शोधण्यास आणि गुन्ह्याची उकल करण्यास यश आलं आहे.
पोलिसांनी या तपासाची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर आत्महत्या करणाऱ्याचे नाव वैभव बुरुंगले असं असल्याचे कळले. तसंच, आत्महत्येआधी त्याने एक सुसाइड नोटदेखील लिहली होती. यात त्याने लिहलं होतं की, मी माझ्या प्रेयसीची हत्या केली आहे. त्याचबरोबर सोबतच LO1-501 हा सांकेतिक क्रमांक लिहून ठेवला होता. मात्र, यात तरुणीचे नाव किंवा इतर कोणतीच माहिती नसल्याचे मृतदेहाचा शोध घेणे पोलिसांसाठी आवघड होऊन बसले होते. तसंच, ती कोण तरुणी आहे? वैभवने तिची हत्या का केली? असे अनेक प्रश्न समोर होते. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारम्बे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी डीसीपी अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली.
12 जानेवारी रोजीच पोलिसांकडे वैष्णवी बाबर ही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. ती 12वीमध्ये शिकत होती. पोलिसांनी हाच धागा पकडत अधिक माहिती गोळा केल्यावर त्यांना थोडी माहिती मिळाली. 24 वर्षांचा वैभव वुरुंगले आणि 19 वर्षांची वैष्णवी बाबर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध पाहता वैष्णवीने वैभवपासून अंतर राखायला सुरुवात केली. त्याचवेळी वैभवला कळले की वैष्णवीचे घरचे तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत.
वैष्णवीच्या लग्नाची वार्ता कळताच वैभवने तिला एकदा शेवटचे भेटण्यासाठी बोलवले. वैभवने तिला खारघर हिलयेथे बोलावले. त्यानंतर झिप चेनने तिची गळा घोटून हत्या केली. वैभवने सुसाईड नोटमध्ये लिहलं वैष्णवीला अधिक त्रास होऊ नये म्हणून वैभवने स्वतःभोवती झिप चेनचा वापर करुन पाहिला. व शेवटी लिहलं की, आता आपण पुढच्या जन्मी सोबत राहू, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना सुसाडइ नोट जरी मिळाली तरी वैष्णवीचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान होते. सुसाईड नोटमध्ये लिहलेला सांकेतिक क्रमांकावरुन मृतदेह शोधणे खूप अवघड होते. जवळपास एक महिना पोलिस याचा तपास करत होते. 12 डिसेंबर रोजी दोघेही खारघर येथे आले होते. पोलिसांनी संपूर्ण खारघर पिंजून काढला मात्र कुठेच मृतदेह आढळून आला नाही.
नवी मुंबई पोलिसांनी फायर ब्रिगेड, सिडको, वन विभाग यांची मदत केली. गुगलवरही तो सांकेतिक क्रमांक टाकला मात्र तरीही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांच्या मदतीला वनविभाग अधिकारी धावून आले. वन विभागाने सांगितले की अशा प्रकारचे नंबर झाडांची गणना करताना दिले जातात. L01–501 कोड देखील कोणत्या ना कोणत्या झाडांना दिला गेला असेल. त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने संपूर्ण रेकॉर्ड शोधून काढला तेव्हा खारघरपासून 6 किमी लांब असलेल्या कंळबोली येथील आढळला.
पत्ता सापडल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचली तेव्हा झाडांमध्ये वैष्णवीचा मृतदेह सापडला. एक महिन्यात तिच्या मृतदेहा छिन्नविछिन्न झाला होता. मात्र तिच्या कुटुंबीयांनी कपडे, घड्याळ आणि आयडीकार्डच्या मदतीने तिची ओखळ पटवली.