मुंबई : दिवसरात्र मेहनत करून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सनदी लेखापाल परीक्षेत वैभव हरिहरनने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. डोंबिवलीकर असलेल्या वैभवचे सर्व स्थरातून कौतुक आणि होत आहे.
सी ए परीक्षेत डोंबिवलीकर वैभव हरिहरनने देशामध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती.
रविवारी संध्याकाळी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात हरिहरन कुटुंबं राहातं.
वैभव लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहे. वैभव दहावी सीबीएसई बोर्ड आणि बारावीतही पहिला आला होता.
सी ए परीक्षेसाठी सुरुवातीला 10 ते 12 तास अभ्यास करत होतो. तर परीक्षा जवळ आल्यानंतर आपण 14 ते 18 तास अभ्यास केल्याचं वैभवनं सांगितलं.