'सी लिंक'च्या धर्तीवर चंद्रपुरात बनतोय 'केबल स्टेड' सेतू

चंद्रपूरच्या इरई नदी वरील दाताळा मार्गावरच्या नव्या पुलाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Updated: Jan 25, 2018, 12:58 PM IST
'सी लिंक'च्या धर्तीवर चंद्रपुरात बनतोय 'केबल स्टेड' सेतू title=

चंद्रपूर : चंद्रपूरच्या इरई नदी वरील दाताळा मार्गावरच्या नव्या पुलाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

जुने आणि नवीन शहर यांना जोडणारा 'जुना' कमी उंचीचा पूल अडसर ठरत होता. ६५  कोटी २० लाख रु. खर्चाचा हा पूल मुंबईतील सागरी सेतूच्या धर्तीवर 'केबल स्टेड' पद्धतीचा असणार आहे.

चौपदरी असणाऱ्या या पुलामुळे चंद्रपूरच्या वैभवात भर पडणार असून इरई नदीला कितीही मोठा पूर आला तरी जुन्या व नव्या शहराचा संपर्क तुटणार नाही एवढी २५ फूट उंची या पुलाला मिळणार आहे.  

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नवीन चंद्रपूर विकसित होण्यासाठी गती येणार आहे.