Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg : वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ भीषण अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत.  

Updated: Dec 28, 2022, 10:09 AM IST
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी title=

Samruddhi Mahamarg Car accident : वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ भीषण अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत. (Car accident on Samruddhi highway in Washim) मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. भरधाव वेगात चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. हे सर्वजण नागपुरातून आले होते. अपघात एवढा भीषण होता की कारमधली लहान मुलगी कारबाहेर 100 फूट लांब फेकली गेली.

अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार 

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आता अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग खुलाहून अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी उलटलाय यादरम्यान एकट्या संभाजीनगर जालना जिल्हा सह जालना जवळील सिंदखेड राजा मार्गाचा विचार केल्यास 28 पेक्षा जास्त लहान मोठ्या अपघात घडले आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ सतर्क झालं असून हे अपघात रोखण्यासाठी धोकादायक वळण तसेच ब्लॅक स्पॉट अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच समृद्धी महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचं पालन होतयका यावरही करडी नजर असणार आहे. 

जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले

मुंबईवरुन नागपूरकडे जात असताना वाशिमच्या कारंजानजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा रात्री भीषण अपघात,या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की लहान मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला  खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूर येथील असून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जातं आहे.

महामार्गावर टायर फुटून अपघात 

 समृद्धी महामार्गावरील पहिला अपघात वायफळ टोलनाक्यावर झाला होता. मर्सिडीज-बेंझने स्विफ्ट कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. 520 किमी नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातांची मालिका सुरु असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढते अपघात लक्षात घेता ताशी 150 किमीचा वेग ताशी 120 किमी करण्यात आला आहे. मात्र, महामार्गावर टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाशिम येथे झालेला अपघात हा टायर फुटून झालाय.