रस्त्याच्या मध्ये ३ तास उभी होती मेंबर ऑफ पार्लमेंट लिहिलेली गाडी

ठाण्यातील विष्णूनगर या गजबजलेल्या भागात रस्त्याच्या मधोमध एक गाडी तब्बल तीन तास उभी होती. या गाडीवर मेंबर ऑफ पार्लमेंट असं लिहिलं होतं आणि खासदार असा लोगोही लावण्यात आला होता. एमएच 03 सीबी 5966 नंबरची ही गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केल्यानं इथं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

Updated: Jul 9, 2017, 03:54 PM IST
रस्त्याच्या मध्ये ३ तास उभी होती मेंबर ऑफ पार्लमेंट लिहिलेली गाडी title=

ठाणे : ठाण्यातील विष्णूनगर या गजबजलेल्या भागात रस्त्याच्या मधोमध एक गाडी तब्बल तीन तास उभी होती. या गाडीवर मेंबर ऑफ पार्लमेंट असं लिहिलं होतं आणि खासदार असा लोगोही लावण्यात आला होता. एमएच 03 सीबी 5966 नंबरची ही गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केल्यानं इथं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

आता खासदाराची गाडी म्हणल्यावर कोणी काही बोलायलाही तयार नव्हतं. दरम्यान, ही गाडी नक्की खासदाराचीच आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. एवढा वेळ उभी असलेल्या या गाडीकडं कुणीच न फिरकल्यानं अखेर पोलिसांनी ही गाडी उचलून तीन हात नाका येथे घेऊन गेले.