केंद्र राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकते : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस,राष्ट्रवादीवर टीका

Updated: Nov 24, 2020, 03:18 PM IST
केंद्र राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकते : प्रकाश आंबेडकर

रविंद्र कांबळे, सांगली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस,राष्ट्रवादीवर टीका केली आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी झाली नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 'आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या'. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष हा संपला आहे, आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही. ऐन निवडणुकीत हॉलिडेमूड मध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीला काय भवितव्य असणार ? अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केली आहे.

राज्यसरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे. राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बगावत आहे. हे घटना बाह्य आहे, त्यामुळे केंद्र कदाचित राष्ट्रपती राजवट लावू शकते. अशी शक्यता देखील माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.