मध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास

मध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.

Updated: Apr 3, 2018, 03:40 PM IST
मध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास title=

जळगाव : मध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.जळगाव शहरातू जाणाऱ्या भुसावळ-मुंबई रेल्वेमार्गावरचा बोगदा. रोज असंख्य जळगावकर या बोगद्याचा वापर करतात. एका वेळेस जेमतेम दोन दुचाक्या जातील इतकीच जागा असल्यानं इथं मोठी वाहतूक कोंडी होते.

रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी या ठिकाणी रेल्वे गेट आहे मात्र तिथं अवजड वाहनांची वर्दळच अधिक असते.. शिवाय रेल्वेगाड्यांची सतत वर्दळ असल्यानं वाहन चालकांना बराच वेळ ताटकळत रहावं लागतं. याचा मोठा फटका रुग्णवाहिकांना बसतो. वाहतूक कोंडीच्या या समस्येला वैतागून जळगावकरांनी नव्या  बोगद्याची मागणी केली. 

सातत्यानं त्याचा पाठपूरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून बोगद्याच्या कामाला मंजुरी मिळाली. दोन महिन्यात बोगद्याचं काम पूर्ण होईल, असे आश्वासनही मिळालं. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन तीन ते चार दिवसांच बोगदा खोदण्यात आला. मात्र त्यानंतर बोगद्याचं काम बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

रेल्वे प्रसासनाच्या ढिसाळ कामाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसतोय. त्यामुळे महापालिका प्रशासनानं याकडे लक्ष घालून नव्यानं बोगद्याचं काम तातडीनं पूर्ण करावं आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा,आशी मागणी जळगावकर करत आहेत.