close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक

नाशिक शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत.  

Updated: May 22, 2019, 05:48 PM IST
उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक
संग्रहित छाया

नाशिक : शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानाचा परिणाम झाल्याने टीव्हीचा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली. शहरातील विनयनगर येथील ही घटना घडली. या स्फोटात मोठे नुकसान झाले आहे.

नाशिकमधील एका फ्लॅटमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या स्फोटामुळे फ्लॅटला आग लागली. त्यामुळे टीव्हीसह फ्रिज आणि घरातील इतर साधने जाळून खाक झालीत. ही घटना विनयनगर दमयंती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील घटली. दरम्यान, आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले आहे.