मराठा आरक्षणासाठी छगन भुजबळ रस्त्यावर उतरायला तयार

जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळांनी पहिल्याच भाषणात आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला आहे. 

Updated: Jun 10, 2018, 08:27 PM IST
मराठा आरक्षणासाठी छगन भुजबळ रस्त्यावर उतरायला तयार  title=

पुणे : माझा मराठा समाज आरक्षाणाला पाठिंबा आहे. मराठा समाज हा मोठा भाऊ, ओबीसी आणि इतर धाकटे भाऊ आहेत. माझा मराठा समाज आरक्षणाला विरोध नाही. त्यांना आरक्षण मिळावं यासाठी ओबीसींना सोबत घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे, असं भुजबळ म्हणाले.

मंडल कमिशनमुळे शिवसेना सोडली. शरद पवारांमुळे ओबीसींना आरक्षण मिळालं. आरक्षणाला विरोध असणाऱ्या पक्षात परत कसा जाऊ? शिवसेनेनं मंडलला विरोध केला म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. शरद पवारांमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. महिलांना आरक्षण मिळाले. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले. हे कसे विसरणार?, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.

जेलमधून जामीनावर बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन पार पडलं. या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी भाजपवर अक्षरश: शाब्दिक वार केले.