गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : महाराष्ट्राच्या कोकणातील हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. सगळेचजण कोकणच्या हापूसची गोडी चाखण्यासाठी आतुर असतात. मात्र, परभणीच्या प्रयोगशील शेतकऱ्याने कोकणच्या हापूस आंब्यालाही मागे टाकले आहे. या शेतकऱ्याने महागड्या आंब्याची शेती केली आहे. या आंब्याची दर 2 लाख 40 हजार रुपये प्रति किलो इतका आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पश्चिम विभागीय कृषी मेळावा पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आला आहे. हा मेळावा 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे. या कृषी प्रदर्शनी मध्ये परभणीच्या शेतकऱ्याने पिकवलेला आंबा हे महत्वाचं आकर्षण ठरले आहे. परभणीच्या वरपूड येथील चंद्रकांत देशमुख हे शेतकरी नेहमीच वेगवेगळे शेतीत प्रयोगाच्या माध्यमातून संशोधन करीत असतात. त्यांनी आनंदीता फार्मसच्या माध्यमातून पर राज्य आणि पदेशातील 79 आंब्याच्या वाणाची लागवड करून उत्तम पद्धतीचे पीक घेतले आहे.
एकूण 12 वाण प्रदर्शनात आणले होते. त्यापैकी तीन वाण हे वरपूडकर यांनी संशोधित केलेली आहेत. विशेष बाब म्हणजे या आंब्याची किंमत 3 हजार रुपयापासून 2 लाख 40 हजार रुपये किलो एवढी आहे. मिया झाकी नावाच्या आंब्याला जपान मध्ये 2 लाख 40 रुपये एवढा दर मिळतो, कोकणातील हापूस आंब्या पेक्षा शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारे आंबे चंद्रकांत देशमुख यांच्या शेतात आहेत. विशेष बाब म्हणजे हे सर्व आंबे सीडलेस म्हणजे कोय नसणारे आहेत. पुढच्या वर्षी या सर्व आंब्याची रोप शेतकऱ्यांना देशमुख उपलब्ध करून देणार आहेत. नेमकी काय वैशिष्ट्य आहेत. या आंब्याची सदर आंबे आपल्या भागात येतात का? त्यांची कशी काळजी घ्यावी लागते. ही परवडणारी शेती आहे का या बद्दलची संपूर्ण माहिती प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे काजू आणि आंबा पीक धोक्यात आलंय. काजू बी आणि मोहोर काळवंडण्यास सुरूवात झालीये. त्यामुळे शेतक-यांनी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यताय. याशिवाय अनेक बागायतदारांना फळी पीक विम्याचे पैसे प्राप्त झाले नाही, अशी तक्रारही त्यांनी केली होती.