2 वर्ष आत राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही, विद्यार्थ्यांना भुजबळांचा सल्ला

छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना डिप्रेशनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Updated: Jun 17, 2022, 05:06 PM IST
2 वर्ष आत राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही, विद्यार्थ्यांना भुजबळांचा सल्ला title=

मुंबई : 'दोन वर्षे मी मध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये नाही गेलो आणि तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येत का ? असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना डिप्रेशनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. (Chhagan Bhujbal on Depression)

'मी ह्या दोन वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये गेलो नाही तर हे सगळं सोडून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. असंच ह्या विद्यार्थ्यांनी सगळं सोडून पुन्हा अभ्यासाच्या कामाला लागावं.' असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

नैराश्यातून बाहेर कसे पडायचे हे तंत्र व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमोर विद्यार्थ्यांना सांगितलं. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते.

आज दहावीचा निकाल लागला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे.