Sambhaji Chhatrapati: गेले काही वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सत्तापालट होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता या स्पर्धेत आणखी एक नेता उतरण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्वाचे विधान केले आहे.
मला मुख्यमंत्री करा मी तुमचे सर्व प्रश्न मिटवतो असं विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापुरात सारथी संस्थेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन स्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.
छत्रपती संभाजीराजेंनी सरसकट फेलोशिपप्रश्नी लक्ष द्यावे आणि प्रश्न मिटवा मग आम्ही आमचा आंदोलन थांबवतो, अशी विनंती करण्यात आली. त्यावर बोलताना संभाजीराजे यांनी 'मला मुख्यमंत्री करा मी तुमच्या सर्व प्रश्न मिटवतो' असं विधान केलंय.