छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीतले, कानड्यांचा खळबळजनक दावा

छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले असल्याचा खळबळजनक दावा

Updated: Jan 31, 2021, 07:55 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीतले, कानड्यांचा खळबळजनक दावा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीमधलेच आहेत, असं अजब वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही, त्यांनी तो वाचला ही नाही, असं कार्जोळ यांनी म्हटलंय. शिवाजी महाराजांचे पूर्वज गदग जिल्ह्यातल्या सोरटूर गावाचे असल्याचा दावा त्यांनी केला. 

कर्नाटकात दुष्काळ पडल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेल्याचा जावईशोध कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी लावलाय. 

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बालिश आहेत, अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.