चितळेंनी 'परंपरा' मोडली! आता दुकान १ ते ४ सुरु राहणार

दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवण्याची परंपरा चितळे बंधूंनी मोडली आहे. चितळेंचं दुकान आजपासून दिवसभर उघडं राहणार आहे.

Updated: Jul 1, 2017, 10:28 AM IST
चितळेंनी 'परंपरा' मोडली! आता दुकान १ ते ४ सुरु राहणार title=

पुणे : दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवण्याची परंपरा चितळे बंधूंनी मोडली आहे. चितळेंचं दुकान आजपासून दिवसभर उघडं राहणार आहे. चितळेंचं डेक्कनमधलं दुकान सकाळी ९ ते ८.३० पर्यंत सुरु राहिलं, असा बोर्ड चितळेंच्या दुकानाबाहेर लावण्यात आला आहे. 

एकीकडे चितळेंनी दिवसभर दुकान उघडं ठेवण्याचा निर्णय घेतला असतानाच एक कडू बातमीही दिली आहे. चितळेंच्या बाकरवडी आणि फरसाणच्या दरांमध्ये आजपासून वाढ झाली आहे. जीएसटी सहा टक्क्यांवरून १२ टक्के झाल्यामुळे २८० रुपये किलोचा भाव ३०० रुपये झाला आहे.