राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याकडे मुख्यमंत्र्याची पाठ ?

 मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमासाठी अद्याप वेळ दिलेला नाही.

Updated: Jul 29, 2019, 06:05 PM IST
राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याकडे मुख्यमंत्र्याची पाठ ? title=

मुंबई : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ (No Holds Barred’) या आत्मचरित्राचे प्रकाशन  १६ ऑगस्टला मुंबईत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली असून त्यांची प्रमुख उपस्थितीती या सोहळ्यात असणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण त्यांनी मात्र कार्यक्रमासाठी अद्याप वेळ दिलेला नाही. एकीकडे युतीची चर्चा होत असताना एनडीएसोबत असलेल्या नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री अजूनही वेळ देत नाहीत. शरद पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

याआधी 4 ऑगस्टला हा प्रकाशन सोहळा होणार होता. पण मुख्यमंत्र्यांच्या उपलब्धता नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. 16 ऑगस्ट रोजी मुंबईत राणेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी अद्यापही वेळ दिलेला नाही. 

राणे यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीला शरद पवार यांची प्रस्तवना आहे.

एनडीएसोबत असणाऱ्या राणेंच्या कार्यक्रमाला अद्याप मुख्यमंत्र्यांनी उपलब्धता न देणं याची चर्चा सध्या आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरण दिसणार का? असे उलटसुलट प्रश्न विचारले जात आहे.