भगवा रंग खंडणी गोळा करत नाही, पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Updated: May 25, 2018, 08:12 AM IST
भगवा रंग खंडणी गोळा करत नाही, पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल title=

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारानिमित्त बोईसरमध्ये आयोजित सभेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  केवळ रक्त भगवं असून चालत नाही, त्यासाठी निष्ठा लागते. भगवा रंग खंडणी गोळा करत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तर ही दिल्लीची निवडणूक आहे गल्लीची नाही. गल्लीत शिट्टी वाजते असं सांगत, त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनाही लक्ष्य केलं.