औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर परिषदेचं उदघाटन झालं.
देशभरातून २७ शहराचे महापौरांनी या परिषदेला हजेरी लावली. महापौरांचं व्हिजन आणि त्या माध्यमातून शहराचा विकास कसा होऊ शकतो याचं सादरीकरण करण्यात आलं.
महापौरांनी ठरवले तर विकास कुणी थांबवू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तर महापौरपद गेल्यानंतर त्यांना शासकीय योजने चा फायदा मिळाला पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. महापौर निवडही थेट मतदान करून व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.