मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लॉकडाऊन वाढणार की अनलॉकला सुरु होणार याकडे राज्याचं लक्ष आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ ही आता कमी होत असली तर देखील धोका टळलेला नाही.
दुसरीकडे लसीकरण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आज काही नवीन घोषणा करणार का याकडे देखील लक्ष असणार आहे.
लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत. त्यामुळे लोकलमध्ये आणखी कोणाला परवानगी दिली जाते का? याबाबत ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
राज्यात लसींचा तुटवडा आहे. 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण अजूनही गतीने होत नाहीये. लसीकरणाला आणखी वेग आणण्याची गरज आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय काय तयारी केली आहे. याबाबत देखील मुख्यमंत्री आज माहिती देण्याची शक्यता आहे.