मरीन ड्राइव्ह ते वांद्रे 12 मिनिटांचा सुपरफास्ट प्रवास; कोस्टल रोडवरच्या सर्वात चॅलेंजिग टप्प्यात 560 टनाचा गर्डर लाँच

Coastal Road : कोस्टल रोडवरचा शेवटचा आणि अत्यंत कठिण टप्पा पार पडला आहे. 560 टनाचा गर्डर लाँच करण्यात आला आहे. यामुळे  कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट होणार आहे.   

वनिता कांबळे | Updated: Dec 1, 2024, 09:06 PM IST
मरीन ड्राइव्ह ते वांद्रे 12 मिनिटांचा सुपरफास्ट प्रवास; कोस्टल रोडवरच्या सर्वात चॅलेंजिग टप्प्यात 560 टनाचा गर्डर लाँच title=

Coastal Road Nariman Point To Bandra :  कोस्टल रोडवरुन सुसाट प्रवास करता येणार आहे. कोस्टल रोडवरचा सर्वात चॅलेंजिग टप्पा पार पडला आहे. कोस्टल रोडवर 560 टनाचा महाकाय गर्डर लाँच करण्यात आला आहे. यामुळे आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हे अंतर फक्त 12 मिनिटातं पार होणार आहे. 

नविन वर्षात संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीला खुला होणार आगे. कोस्टल रोडवर  60 मीटर लांब, 560 टनाचा गर्डर जोडण्याचे काम पूर्ण झालंय. मुंबई महापालिका प्रशासनाने ही माहिती दिलीय. वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी आज तिसरा आणि शेवटचा महाकाय गर्डर बसवण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी महाकाय गर्डर बसवण्यात आला आहे. महिनाभरात सिमेंट काँक्रिट, अस्फाल्ट करणे अशी कामे पूर्ण झाल्यावर हा कोस्टल रोड सुरु करण्यात येईल. 

या गर्डरमुळे  मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला जाणार आहे. यामुळे कोस्टल रोडवरुन  मरीन ड्राइव्ह ते वांद्रे असा थेट प्रवास करता येणार आहे. यामुळे अवघ्या 12 मिनिटांत मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास पूर्ण होणार आहे.  कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळी परिसात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे.