Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

नेहा चौधरी | Updated: Dec 1, 2024, 08:59 PM IST
Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात title=

Mahayuti Swearing in Ceremony : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झालीय. हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा असणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात शपथविधीचा सोहळा रंगणार आहे. भाजप पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंकडून बैठकांचं सत्रही सुरू झालं. (mahayuti swearing in ceremony Grand preparation in mumbai Azad Maidan 5 December maharashtra cm oath ceremony maharashtra politics)

शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी!

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालीय. राज्यासह देशभरातील 15 हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय. महत्त्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विविध राज्यातील मुख्यमंत्री, बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. एवढंच नाही तर महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी सेलिब्रिटींसह, धर्मगुरु, साधूसंतांनाही आमंत्रण दिलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्यांनाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं निश्चित करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकांचं सत्रही सुरू झालंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन स्वतंत्र बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे,अशी माहिती मिळतेय. फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्यानं राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे. 

आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा!

सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसंच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असं आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलंय.