गाढ झोपेत चिमुकलीच्या गळ्याला कोब्र्याचा विळखा, मध्यरात्री घडलेल्या घटनेनं उडाला थरकाप

या मुलीने 2 तास त्या कोब्राचा धीरोदात्तपणे सामना केला. त्यामुळे या मुलीच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 

Updated: Sep 11, 2021, 06:48 PM IST
गाढ झोपेत चिमुकलीच्या गळ्याला कोब्र्याचा विळखा, मध्यरात्री घडलेल्या घटनेनं उडाला थरकाप title=

वर्धा : अंगावर काटा आणणारी ही बातमी आहे. वर्ध्यात ७ वर्षांच्या चिमुरडीला विषारी कोब्रानं गळ्याला गुंडाळलं. त्यानंतर या कोब्रानं मुलीच्या हातावर दंश केला. हा सर्व प्रकार मध्यरात्री ही घडला. अंगावर काटा आणणार हा सर्व थरार कॅमेरात चित्रीत झालाय. वर्ध्यातील सेलू तालुक्यात झडशी गावाजवळच्या बोरखेडी कलामधली ही धक्कादायक घटना आहे. सध्या या चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  (cobra wrapped around the littile girl neck for about two hours in wardha) 

नक्की काय झालं? 

गडकरी कुटुंबीय मध्यरात्री गाढ झोपेत होते. या मुलीच्या शेजारी तिचे वडील झोपले होते. त्याचवेळी अचानक नागाच्या फुसकारण्याचा आवाज आला. त्यामुळे वडील खाडकन जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ज्यामुळे त्यांची झोपचं उडाली. मुलीच्या गळ्याला या कोब्राने वेटोळे  घातले होते. मुलीनीही डोळे उघडले. "हालचाल करु नकोस, अशीच स्थिर पडून राहा", असं आईवडील आपल्या मुलीला म्हणाले. हा कोब्रा मुलीच्या मानेला तब्बल 2 तास वेटोळे घालून बसला होता. यामुळे या चिमुरडीला हे सर्व सहन झालं नाही.

अखेर मुलीने हालचाल केली. हालचाल केल्याने कोब्राने तिला दंश केला. हे सर्व सुरु असतानाच सर्पमित्राला या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली. सर्पमित्र घटनास्थळी पोहचला. सर्पमित्र पोहचल्यानंतर तो कोब्रा कुठल्या कुठे निघून गेला याचा कोणालाही पत्ता लागला नाही. या मुलीने 2 तास त्या कोब्राचा धीरोदात्तपणे सामना केला. त्यामुळे या मुलीच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी आहे.