close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काँग्रेसला आणखी एक झटका, सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार

झी 24 तासाचे वृत्तं खरे ठरले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बरोबर शिराळा तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले.

Updated: Sep 15, 2019, 09:38 PM IST
काँग्रेसला आणखी एक झटका, सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : झी 24 तासाचे वृत्तं खरे ठरले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बरोबर शिराळा तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कासेगांव येथे उद्या सकाळी ९ वाजता सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. सत्यजित देशमुख यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे.

स्वार्थाच्या मुद्यावर सुरू झालेला, राष्ट्रवादी हा पक्ष आहे, म्हणून त्यांचे तुकडे तुकडे होत आहेत. 1995 ची काँग्रेसची सत्ता शरद पवार यांनी घालवली, अशी टीका देखील सत्यजीत देशमुख यांनी केली आहे.