कॉंग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या वाटेवर

 कॉंग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला 

Updated: Aug 30, 2019, 05:18 PM IST
कॉंग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या वाटेवर  title=

मुंबई : भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या जोरदार मेगा भरती सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून हा प्रवाह भाजपा-शिवसेनेच्या दिशेने वाहू लागला आहे. दरम्यान कॉंग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे भाजपच्या वाटेवर आहेत. काही वेळेत राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सोपवत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज भाजपमध्ये गेलेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार नाही याची खात्री असल्याने हे सर्वजण सत्तेतून मिळणारे फायदा उचलण्यासाठी भाजपच्या दारात जात असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार, विखेपाटील पिता पुत्र यांनी आधीच भाजपा प्रवेश केला आहे. तर नारायण राणे यांनी देखील भाजपात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.