Amit Deshmukh : अमित देशमुख काँग्रेसचा 'हात' सोडणार?, निलंगेकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले...

 Amit Deshmukh News : काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आता रंगली आहे. मात्र, नाना पटोले म्हणाले...

Updated: Jan 12, 2023, 01:06 PM IST
Amit Deshmukh : अमित देशमुख काँग्रेसचा 'हात' सोडणार?, निलंगेकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले... title=
Amit Deshmukh News

Maharashtra Political : राज्याच्या राजकीय क्षेत्रात लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आता रंगली आहे. (Maharashtra Political News in Marathi) भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी तसे वक्तव्य केले आहे. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हटले आहे. 

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची अशी प्रतिक्रिया

राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख भाजपात येणार असल्याचे विधान निलंगेकरांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या मेळाव्यात केले. तेव्हा लातूरच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटले आहे. 

भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते. मात्र, आम्ही त्यांना विरोध केला आहे. निलंगेकर म्हणाले की, जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही.

लातूरमध्ये देशमुख घराण्याचा दबदबा

दरम्यान, लातूरच्या राजकारणात देशमुख घराण्याचे मोठे नाव आहे आणि त्यांचे  वर्चस्वही आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. लातूर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. लातूर शहर आणि ग्रामीणमधून काँग्रेसचे आमदार आहेत. अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघे सख्खे भाऊ आमदार आहेत. अमित देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. या आधी अभिनेता आणि भाऊ रितेश देशमुख यांने अमित देशमुख यांचा प्रचार केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससाठी मतदानाचे आवाहन केले होते. त्यामुळे अमित देशमुख काँग्रेसला राम राम करतील का, याची चर्चा निंगलेकर यांच्या विधानानंतर सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे  याबद्दल भाजपकडून कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधान केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसकडून प्रतिक्रिया आल्याने केवळ ही राजकीय चर्चाच असल्याचे बोलले जात आहे.