Amravati News: हल्ली निवडणूकांच्या वेळी अनेक प्रकारची स्टंटबाजी होताना दिसते. त्यामुळे जनतेचे लक्ष हे निवडणूकांपेक्षा (Elections in Maharashtra) अशा स्टंटबाजीकडे जास्त प्रमाणात वेधले जाते. सध्या असाच एक प्रकार अमरावतीत पाहायला मिळाला आहे. एका तरूणानं चक्क चक्क शर्ट काढून अर्धनग्न होत बनियानवर (Men's Inner Wear) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्यानं अमरावती पदवीधर निवडणूकीसाठी दाखल केला आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी चक्क शर्ट काढून अर्धनग्न होत बनियानवर येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी रोखले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला. कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुस 100 टक्के अनुदान द्यावे, पटसंख्याच्या निकष लावून जिल्हा परिषदच्या बंद करू नये. शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर बेरोजगार (Unemployment) यांना न्याय मिळावा. यासाठी आपली उमेदवारी असल्याचे उमेदवार पाटील यांनी सांगितले. या उमेदवाराची विभागीय आयुक्त परिसरात चांगलीच चर्चा झाली. निवडून आल्यास तसेच मागण्या मान्य होईपर्यंत अंगात शर्ट घालणार नसल्याचेही ते म्हणाले.
शिक्षक आणि पदविधरांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे आपण अमरावती पदवीधर मतदार संघात आपली उमेदवारी दाखल केली असून पदवीधर आणि शिक्षकांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या निवडून आल्यावर जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत अंगात शर्ट (Shirtless) न घालण्याचा निर्धार पाटील यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या पाटील यांची सध्या संपूर्ण विभागात चर्चा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा
अमरावती पदवीधर मतदारसंघात निवडणुकीसाठी 25 उमेदवारणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून अद्यापपर्यंत 105 अर्जांचे वाटप झाले आहे. तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. रणजीत पाटील यांनी अर्ज दाखल केला. असून प्रमुख लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार आहे. महाविकास आघाडी कडून धीरज लिंगाडे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
सध्या या प्रकारानं सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही स्टंटबाजी सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे. बिनायनवर उमेदवारी अर्ज देतानाच व्हिडीओही (Viral Video) सगळीकडे व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे.