आघाडीत बिघाडी : 'या' जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला केले बाजुला

Osmanabad District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येत महाविकास आघाडीने निवडणूक लढवली आणि बाजीही मारली. मात्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले.  

Updated: Mar 7, 2022, 04:07 PM IST
आघाडीत बिघाडी : 'या' जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला केले बाजुला   title=

उस्मानाबाद : Osmanabad District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपविरोधात  एकत्र येत महाविकास आघाडीने निवडणूक लढवली आणि बाजीही मारली. मात्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजुला सारत जिल्हा बँकेत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेते, याची उत्सुकता आहे. (Congress-NCP Administration in Osmanabad District Government Bank elections)

उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. मात्र, शिवसेनेला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे बापूराव पाटील अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

15 पैकी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना प्रत्येकी 11 मते मिळालीत. तर शिवसेनेचे 1 मत फुटले. शिवसेनेच्या उमेदरवाराला फक्त 4 मते मिळालीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर निवडणुकीचे चित्र बदले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना जोरदार मानला जात आहे. भाजपाच्या विरोधात एकत्र येत महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसने बँकेवर सत्ता काबीज केली. मात्र, आघाडी करुन निवडणूक लढविलेल्या शिवसेनेला बाजुला सारल्याने शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे.