काँग्रेसची दुसरी यादी : पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.  

Updated: Oct 1, 2019, 11:22 PM IST
काँग्रेसची दुसरी यादी : पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख यांना उमेदवारी title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि लातूर ग्रामीणमधून दिवंगत विलासराव देशमुख यांचे पूत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत एकूण  ५२ उमेदवारांची  नावे यादी जाहीर करण्यात आली आहेत.

 नागपूर पश्चिमधून विकास ठाकरे, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईतील अंधेरी पूर्वमधून जगदीश अमीन  यांना संधी देण्यात आली आहे. तरसुरेश शेट्टींचा पत्ता कापण्यात आला आहे. डोंबिवलीतून राधिका गुप्ते यांना संधी देण्यात आली आहे. वाशिममधून रजनी राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोरेगावमधून युवराज मोहिते यांना संधी देण्यात आली आहे. कल्याणमधून कांचन कुलकर्णी या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.