काँग्रेसची पदयात्रा, वसंतदादा पाटील यांचे घराणे निवडणुकीपासून दूर

विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारांची प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

Updated: Oct 8, 2019, 02:29 PM IST
काँग्रेसची पदयात्रा, वसंतदादा पाटील यांचे घराणे निवडणुकीपासून दूर title=

सांगली : विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराला हरिपूरच्या संगमेश्वर मंदिर इथून सुरुवात झाली. काँग्रेसमधील सर्व गटांचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी हरिपूरमध्ये पदयात्रा काढण्यात आली. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घराणे सांगलीच्या विधानसभा निवडणुकीपासून दूर आहे. 

काँग्रेसने वसंतदादा घराण्याला डावलत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिले आहे. पृथ्वीराज पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पक्ष श्रेष्ठींच्या चर्चेनंतर काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार एकदिलानं करण्याचा निर्णय वंसतदादा पाटील घराण्यानं घेतला आहे. मेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वसंतदादा घराणे उपस्थित होते. मदानभाऊ पाटील गट पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार करत आहे.