"पाटलांच्या पोरांना लग्नाआधी..."; प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची जीभ घसरली

वयाच्या 17 व्या वर्षी 302 चे कलम भोगणारी आमची पोरं आहेत, असेही राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने म्हटलं आहे

Updated: Nov 12, 2022, 09:55 AM IST
"पाटलांच्या पोरांना लग्नाआधी..."; प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची जीभ घसरली title=
(फोटो सौजन्य - फेसबुक)

सोलापुरातील (Solapur) बहुचर्चीत मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा (Election) सध्या धुराळा उडाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने, खासदार धनंजय महाडिक, मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याची (Bhima Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना विद्यमान अध्यक्ष आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले होते. मात्र, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी महाडिकांचे आवाहन धुकावत आपले उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र प्रचारसभेत बोलताना माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली. (Controversial statement of former NCP MLA Rajan Patil during  Bhima Sahakari Sugar Factory Solapur district)

एका प्रचार सभेत बोलताना माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली. आम्ही पाटील आहोत आणि पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुझ्या एवढी बाळ असतात, असे म्हणत राजन पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली.

"निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटलांच्या कुटुंबाची हेच कळायला मार्ग नाही. आमच्या पोरांना बाळं म्हणत आहेत. आम्ही पाटील आहोत. पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळं असतात आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. तुम्ही आमच्या पोरांना भीती दाखवत आहात. वयाच्या 17 व्या वर्षी 302 चे कलम भोगणारी आमची पोरं आहेत," असे म्हणत राजन पाटील यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन केले.

दरम्यान, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आव्हान दिले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी लढत होणार आहे. 13 तारखेला हे मतदान होणार असून 14 तारखेला मतमोजणी होणार आहे.