नाशिकमध्ये 171 पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारंभ

न्यायालयाच्या निकाला नंतर मिळाले प्रशिक्षण, दहा महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत मिळवली पदोन्नती 

Updated: Jun 17, 2022, 08:00 PM IST
नाशिकमध्ये 171 पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारंभ title=

सोनू भिडे, नाशिक-  नाशिक मधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत आज (१७ जून) प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या  121 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय कुमार, अकादमीचे संचालक राजेश कुमार कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले.

प्रत्येकाला कामात पदोन्नती मिळावी अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी जीवापार कष्ट करत असतो. मात्र राज्यातील पोलीस दलामधील उमेदवारांनी २०११ साली खातेंतर्गत परीक्षा देऊनही पदोन्नती मिळाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांनी कोर्टाचा (मॅट) दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाच्या निकालान्वये गुणवत्तेच्या आधारे खात्यांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा निकाल देण्यात आला.

2 ऑगस्ट २०२१ रोजी नाशिकच्या पोलीस अकादमीत १७१ उमेदवारांना उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. या उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी मध्ये १७१ प्रशिक्षणार्थी होते. यात १५८ पुरुष तर १३ महिला होत्या. या १२१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला यात राजू साळवे यांना बेस्ट कॅडेट, बेस्ट स्टडी, बेस्ट ट्रेनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तर उर्मिला खोत याना बेस्ट वूमन कॅडेट ने सन्मानित करण्यात आलंय. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालकांनी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

राजू साळवे सांगतात, २००६ मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात भर्ती झालो होतो. २००७ साली नागपूरला ट्रेनिंग केली पूर्ण केली. या प्रशिक्षणात माझा पहिला क्रमांक आलं होता. माझ्या नोकरीची सुरवात नाशिक ग्रामीण मध्ये केली. २००८ ते २०१४ पर्यंत क्राईम ब्रांच इगतपुरी येथे काम केले. २०१४ ते २०२० मध्ये स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे काम केले. दरम्यान अनेक गुन्हे घडकीस आणले. २०११ साली परीक्षा दिली होती. त्याचा निकाल २०१३ मध्ये लागला. न्यायालयाच्या निकाला नंतर आज उपनिरीक्षक पदाच प्रशिक्षण पूर्ण करून आनंद होत आहे.