Pune News in Marathi: पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क आणि विमानतळ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजबेकिस्तान आणि राजस्थान येथील दोन युट्यूब अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आले आहे. विदेशातून हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune News Today)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. दलाल या दोन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करत राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजस्थानी अभिनेत्री आणि २ मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेने विमाननगर भागातून ताब्यात घेण्यात आलं. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत होता.
ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी अभिनेत्री आणि दोन रशियन मॉडेल पुण्यात आल्या होत्या. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचला. पोलिसांनी शिताफीने एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशिय मॉडेलला वेश्या व्यवसाय करताना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर हा हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय विदेशातून चालवण्यात येत होता, हे उघड झालं आहे.
ऑनलाइन पद्धतीने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर आहे. तर, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मसाज सेंटर, कॉफी सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची अनेक प्रकरणे समोर आले आहेत.