Corona : राज्यात आजही कोरोनाचा उद्रेक, रुग्णांमध्ये मोठी वाढ

राज्यात आज इतकी मोठी वाढ

Updated: Apr 6, 2021, 10:35 PM IST
Corona : राज्यात आजही कोरोनाचा उद्रेक, रुग्णांमध्ये मोठी वाढ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 55,469 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आता 31,13,354 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे 297 जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 56,330 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आज 34,256 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 25,83,331 रूग्ण बरे झाले आहेत. 
  
गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 10,030 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4,72,600 झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 11,832 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आज दिवसभरात 5600 रुग्णांची वाढ झाली असून 3481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.