धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने हाकाकार माजवला आहे.  

Updated: Apr 17, 2021, 01:26 PM IST
धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

अनिरुद्ध दवाळे / अमरावती : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने हाकाकार माजवला आहे. रुग्णांना रेमडेसिवीर औषध मिळण्यास अडचण येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असताना दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाटमध्ये (Melghat) कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यांनी चक्क या महिलेला मंत्रिकाकडे नेले. मात्र, उपचाराच्या नावाखाली नेण्यात आलेल्या या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे.

मंत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 45 वार्षिय आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मेळघाटमधील सिमाडोहमध्ये समोर आली आहे. या महिलेला ताप, सर्दी, खोकला असल्याने तिची सिमाडोह येथील डॉक्टरांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. परंतु तिने आणि तिच्या नातेवाईकांने डॉक्टरांवरच रोष व्यक्त करत उपचार घेन्यास नकार दिला होता.

तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील सिमाडोह येथील महिलेची प्रकृती ठिक नसल्याने ती उपचार घेण्यासाठी सिमाडोह येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. तेव्हा तेथील डॉक्टरांनी तिची कोरोना चाचणी केली. या दरम्यान तिचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्याने डॉक्टरांनी तिला तेथेच उपचार घेण्यास सांगितले. परंतु मला कोरोना झाला नाही, माझा रिपोर्ट खोटा आहे, असं तिने आणि तिच्या कुटुंबाने सांगत डॉक्टराना शिवीगाळ केली. त्यावेळी उपचार करण्यासाठी चक्क तिथून दहा किलोमीटर असलेल्या भावई येथे मंत्रिकाकडे त्याच्या नातेवाईकांनी नेले. 

दरम्यान मंत्रिकाकडे उपचार घेत असतानाच या महिलेचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. एकीकडे डॉक्टरांकडून सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ताप, सर्दी, खोकला झाला तर वेळेत उपचार घ्या आणि काळजी घ्या. मात्र, असे तरी स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देखील आजही मेळघाटात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे, हे स्पष्ट झाल आहे. या अंधश्रध्देच्या जोखडातून केव्हाआदिवासी मुक्त होतील हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.