कोरोना संशयिताचा मृत्यू; कारण अद्यापही अस्षष्ट

कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने मोठी खळबळ...

Updated: Mar 30, 2020, 10:31 AM IST
कोरोना संशयिताचा मृत्यू; कारण अद्यापही अस्षष्ट
संग्रहित फोटो

कोल्हापूर : कोल्हापूरात एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या रुग्णाचा कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना संशयिताचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. 

कोल्हापूरातील मृत संशयित हातकणंगले तालुक्यातील राहणारा होता. या रुग्णाचे नमुने पाठवण्यात आले असून अद्याप याचा अहवाल मिळाला नाही. अहवाल मिळाल्यानंतरच संशयिताच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 12ने वाढली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता पुण्यात 5 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुबंईत 3 नवे रुग्ण आढळले. तर नाशिक, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळलाय. नागपूरमध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद आहे. 

राज्यात आतापर्यंत 203 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत 85 रुग्ण आणि 6 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.